Dev Manus review critics

देव माणूस चा शेवट ने पूर्ण सिरीयल ला काळिमा फासला । प्रेक्षक नाराज | Dev Manus Ending Review

Dev Manus ending review and audience response to the end of serial. The worst ending for the serial which made all previous episodes meaningless.

महाराष्ट्रा मध्ये TRP चा धुमाकाळ घालणारी सिरीयल देव माणूस चा अंत होणार अस सांगत शेवट झालाच नाही. देव माणूस हि सिरीयल एका खऱ्या घटने वर आधारित आहे असे म्हणत म्हणत सिरीयल कधी सत्य घटने पासून दूर गेली समजलेच नाही.

आज आपण देव माणूस च्या शेवटचा भाग म्हणजेच २ तासाचा special भाग ह्या बदल थोडी चर्चा करणार आहोत. लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. १५ ऑगस्ट २०२१ रोजी देव माणूस सिरीयल संपणार असे प्रक्षेपण दाखवत २ तासाचा special  भाग प्रसारित झाला.

अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जे सिरीयल मध्ये शेवटी बिन अर्थी सोडले आहेत. आणि बऱ्याच गोष्टी असेहि आहेत कि ज्यामुळे पूर्ण सिरीयल ला अर्थ व्यर्थ झाला आहे.

कोणत्याही सिरीयल चा शेवट हा त्या सिरीयल ची ओढ वाढवणारा असावा पण देव माणूस ह्या सिरीयल चा शेवट पाहून प्रेक्षकांना पूर्वी पाहिलेले एपिसोड सुद्धा व्यर्थ वाटायला लागले आहेत. कारण शेवट हा पूर्ण मालिकेचा सार असतो जो सिरीयल ला तारीफ मिळवून पूर्ण करत असतो पण इथे तारीफ करण्यासारखा अंत झालाच नाही.

बाकी सिरीयल मधील सर्व पात्र खूप छान आहेत, आणि सर्वांचाच अभिनय खूप मनमोहक आहे. अजित कुमार पासून नाम्याचा मॉल पर्यंत सर्व पात्रांनी त्यांची भूमिका खूप जीव ओतून सादर केली आहे. किरण गायकवाड ह्यांचा अभिनय खूपच अप्रतिम आहे आणि त्यांनी देव माणूस ह्या सिरीयल मध्ये खरा जीव आणला आहे.

आपण इथे आता प्रेक्षकांकडून मिळालेला वाईट प्रतिसात बदल चर्चा करू, सिरीयल बद्दल असे खूप positive प्रतिसाद आहेत पण आपण इथे फक्त शेवटचा २ तासाचा special भाग बद्दल बोलणार आहोत.

२ तासाचा भाग व्यर्थ

२ तासाचा भाग म्हणून असं काही मस्त आणि मसाले दार काहीच पाहायला मिळाले नाही. जे रोज पाहत होतो तेच आणि तसेच पाहायला मिळाले. special भाग म्हणजे एक वेगळी उत्सुकता असते ज्यामध्ये प्रेक्षकांना काही अपेक्षित आणि climax पाहायला मिळावे अशी इच्छा असते पण देव माणूस चा special  भाग हा रोज प्रमाणे प्रसारित होतो असेच दिसले.

पूर्ण उत्सुकता गेली पाण्यात

प्रेक्षकांना जास्त उत्सुकता होती कि असे कोणते पुरावे पोलीस आणि चंदा हुडकणार कि ज्याने अजित कुमार उर्फ देवी सिंघ पोलिसांच्या तावडीत सापडणार, पण पुराव्या च्या आस पास पण नाही फिरकला एपिसोड. प्रेक्षकांना अपेक्षित होते कि नेहमीच timepaas सोडून आज सिरीयल पूर्ण अजित सिंग वर फोकस असेल पण नेहमी प्रमाणे बाकीच्या पात्रांची वेळ घालवू कृत्य तसेच पाहायला मिळाले.

शेवटच्या भागाचे प्रोमोशन चा अर्थ व्यर्थ

ज्या प्रमाणे शेवटच्या भागाचे प्रोमोशन केले होते त्याप्रमाणे असे काहीच पाहायला मिळाले नाही. आपल्याला special भागात काय होईल असे दाखवले होते त्याप्रमाणे त्यात असे काहीच झाले नाही.भागाच्या  प्रोमोशन ला आपल्याला दाखवले होते कि तो सर्व खून कदाचित काबुल करेल आणि चंदा पार त्याचा चेंदा मेंदा करेल पण असं काहीच झाले नाही.

रिंकू भाभी च्या मृत्यूला कोणीच विचारले नाही

काही दिवसांपूर्वी रिंकू नावाचे एक पात्र घुसवले गेले होते, त्या पात्र मागे एक विशेष अर्थ असावा असा लोकांचा समज होता आणि असायला हि पाहिजे. पण सिरीयल मध्ये रिंकू भाभी चे पात्र खूपच विचित्र आणि बिनउपयोगाचे होते. प्रेक्षकांना उत्सुकता होती कि पोलीस आणि चंदा रिंकू मुले देवी सिंग ला पकडू शकतील. रिंकू ला फसवताना चंदा काही पुरावे गोळा करेल आणि देवी सिंग चा परदा फाश होईल. पण वे पात्र बिन कामी ठरले, एका दारातून आले आणि दुसऱ्या दारातून सहज गेले.

बाकी रिंकू चा अभिनय खूप छान प्रकारे पार पडला गेला आहे.

डिम्पल ला सर्वांनी सिम्पल मध्ये घेतले

डिम्पल पळून गेल्या वर तिला कोणी काहीच चौकशी केली नाही. घरच्यांनी परत लग्नाचा विषय काढला नाही. बऱ्याच गोष्टी होऊ शकत होत्या पण त्या टाळल्या गेल्या आहेत. असो सिरीयल आहे ज्या गोष्टी आपण सादर करू शकत नाही त्यांना असच वगळून दिल्या सारखे दिसते.

देवी सिंग ला शिक्षा झालीच नाही आणि मेलाहि नाही

एका देव माणसाचा होणार अंत असं करत प्रोमोशन करून अंत झालाच नाही, प्रेक्षकांना अपेक्षा होती कि शेवटी देवी सिंग ला पकडतील आणि सरळ साधा एक twist आणि मस्त प्लॅन आपल्या सर्वांसमोर सादर होईल. प्रेक्षकांना देवी सिंग ला झालेला त्रास पाहायचा होता जो चंदा खूप छान प्रकारे करत होती पण शेवट असा काही दाखवला कि सर्वच बोंबलल.

शेवट

तस पाहायला गेलं तर दिव्या सिंग च्या आगमन झाल्या नंतर लोकांमध्ये खूप उत्सुकता होती कि case कशी सोडवली जाईल. पण प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सिरीयल चा शेवट लांबला मुळात शेवट झालाच नाही, शेवट पाहून असेल दिसते कि ह्या मालिकेचा दुसरा भाग येऊ शकतो. प्रेक्षकांमध्ये देवी सिंग ला पकडण्यासाठी चालू असलेली ढापद मुळात खूप धमाकेदार होती आणि शेवटचा भाग पूर्ण पाने त्यावरचं हवा होता. पण असो दिग्दर्शक च्या मनात काय आहे हे त्यांनाच माहीत.

आमच्या सर्व टीम कडून देव माणूस च्या पूर्ण टीम ला धन्यवाद, तुम्ही ज्या प्रमाणे मालिका सादर केली आणि जे अभिनेते आहेत त्यांचेही आभार. 

dev manus review

dev manus review dev manus review dev manus review dev manus review dev manus review dev manus review dev manus review

Posted in Entertainment And News and tagged .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *